
हिंदुस्थानचे 47वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे 18 नोव्हेंबरला शपथ घेणार आहेत. सरन्यायाधीशपदावर विराजमान होणारे बोबडे हे चौथे मराठी न्यायमूर्ती आहेत. यापूर्वी पी. बी. गजेंद्र गडकर, यशवंत चंद्रचूड आणि व्ही. एन. खरे यांना हा बहुमान मिळाला आहे. न्याय. बोबडे पुढील 17 महिने सरन्यायाधीशपदी राहणार आहेत.

























































