
देशातील बिकट आर्थिक परिस्थितीवर सरकारकडून योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याने सरकारविरोधात काँग्रेस मोठे आंदोलन छेडणार आहे. येत्या 5 ते 15 नोव्हेंबर या काळात हे आंदोलन छेडले जाणार आहे. देशातील आर्थिक परिस्थितीबाबत 1 ते 8 नोव्हेंबर या काळात केंद्र सरकारविरोधात 35 पत्रकार परिषदा घेऊन जनतेसमोर देशाची आर्थिक स्थिती मांडण्यात येणार आहे. 5 ते 15 नोव्हेंबर या काळात देशात ठिकठिकाणी हे आंदोलन केले जाणार आहे.
























































