तमिळनाडूत 15 जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शाळा कॉलेज बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळनाडूतील 15 जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचले आहे. यामुळे येथील 6 जिल्ह्यातील शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच हवामान खात्याने येत्या 48 दिवसात 15 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून राज्य सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. गरज असल्यास घराबाहेर पडा अथवा घरात राहा. असे आवाहन राज्य सरकारने नागरिकांना केले आहे.

तिरुनेलवेल्ली, तूतीकोरिन, थेनी, विरुधुनगर, वेल्लोर आणि रामनाथपुरम या जिल्ह्यतील शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत.