
कल्याण-ठाकुर्ली दरम्यान तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने होणारी जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप जलद मार्गावरील लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक बिघडले आहे.
दरम्यान, बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर येईल अशी माहिती देण्यात येत आहे.

























































