
हिंदुस्थानात लग्नासाठी कायदेशीररित्या मुलीचे वय 18 तर मुलाचे वय 21 असणे गरजेचे आहे. तरच ते लग्न अधिकृत समजले जाते. जर या ठरवून दिलेल्या वयापेक्षा कमी वयात लग्न केले तर ते अधिकृत मानले जात नाही. त्यामुळे केंद्र सरकार सध्या पुरुषांचे लग्नाचे वय कमी करण्याचा विचार करत आहे.
महिला व बाल विकास मंत्रालयाकडून याबाबत एक प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो लवकरच न्याय व कायदा मंत्रालय, आरोग्य मंत्रालयाकडे सादर केला जाणार आहे. या प्रस्तावावर या मंत्रालयांमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यावर अधिकृतरित्या निर्णय घेण्यात येईल असे समजते.

























































