
हल्ली पालक ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईट्सवरून आपल्या मुलांसाठी योग्य वधू वर शोधत असतात. बऱ्याचदा एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे स्थळ आले की हल्ली सोशल मीडियावर त्याचे प्रोफाईल देखील तपासले जाते. त्यामुळे हल्ली पालकांनी मुलांसाठी वर वधू शोधण्यासाठी सोशल मीडियाची देखील मदत होते. मात्र याच सोशल मीडियावर सध्या एक उलटच प्रकार घडला आहे. चक्क एका मुलीने तिच्या आईसाठी ‘योग्य वर’ शोधण्याची मोहिम ट्विटरवरून सुरू केली आहे. तिच्या पोस्टला नेटकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
Looking for a handsome 50 year old man for my mother! 🙂
Vegetarian, Non Drinker, Well Established. #Groomhunting pic.twitter.com/xNj0w8r8uq— Aastha Varma (@AasthaVarma) October 31, 2019
आस्था वर्मा असे त्या मुलीचे नाव असून तिने ट्वि्टरवर तिच्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यात तिने एक पोस्ट शेअर करत तिच्या आईसाठी योग्य वर शोधत असल्याचे म्हटले आहे. “माझ्या आईसाठी एक देखणा 50 वर्षांचा माणूस मी शोधत असून तो शाकाहारी,बिनव्यसनी व चांगला असावा’ असे ट्विट तिने केले आहे. त्या ट्विटला 5 हजाराहून अधिक रिट्वीट मिळाले असून जवळपास 27 हजार लाईक्स मिळाले आहेत.
आपल्या आईसाठी वर शोधायला आस्थाने घेतलेल्या पुढाकाराचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. तसेच तिच्या आईला योग्य वर मिळावा म्हणून शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अनेकांनी तर तिच्या आईसाठी योग्य वरांचे प्रोफाईल देखील तिला पाठवले आहेत.
all the best
— Dr. GILL 2.0 (@ikpsgill1) October 31, 2019
This is the cutest thing i have come across today ❤️❤️❤️❤️
— Arti (@thegirl_youhate) October 31, 2019
So sweet and wonderful what you’re doing for your mom.. hope she finds love, joy and happiness. ❤️
— SambhavāmiYugeYuge (@WindsOfChange72) October 31, 2019
























































