लोणार तालुक्यात अतिवृष्टीने सोयाबीनचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाण्यातील लोणारमध्ये सोंगणीसाठी आलेल्या व सोंगणी झालेल्या सोयाबीनचे रात्री झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यात शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. 36 टक्क्यांवर सरसकट सर्वे करण्याचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी सांगितले.

शुक्रवारी रात्री लोणार तालुक्यात अतिवृष्टी होऊन 56 मिमी. एवढ्या पावसाची नोंद झाली. तालुक्यातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा जास्त 891 मि.मी. एवढा नोंदविला गेला. तालुक्यातील सुलतानपूर विभागात 79 मि.मी. एवढा पाऊस काल झाल्याची नोंद असल्याचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी सांगितले. रात्री झालेल्या पावसामुळे सकाळपासून लोणारकडे येणार सर्व रस्ते बंद होते. सुलतानपूर विभागातील मेहकर तालुक्यात असलेल्या गणपूर येथील शेतातील सोयाबीनच्या सुड्या अक्षरश: वाहत जातानाचे लोकांनी व्हिडीओ चित्रीकरण केले. शुक्रवारी सायंकाळपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि रात्री 1 वाजेनंतर परत मुसळधार जोरदार पाऊस होऊन शेतात असलेल्या सुड्या पाण्यावर तरंगताना दिसत आहे. सर्वे सुरु असून सरसकट नुकसान घेण्याचे आदेश तहसीदारांनी दिले आहे.