
बिहार येथे शनिवारी झालेल्या छटपूजेदरम्यान भिंत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
बिहार येथील समस्तीपूर इथे ही घटना घडली. येथील हसनपूर बडगाव इथे एका नदीच्या घाटावर छट पूजा सुरू होती. त्यावेळी अचानक घाटाजवळील मंदिराची भिंत कोसळली. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. भिंत कोसळल्यानंतर तिथे अचानक हलकल्लोळ माजला आणि पूजेसाठी आलेले लोक इतस्ततः धावू लागले. या गोंधळात थोडी चेंगराचेंगरीही झाली.
Bihar: Two women dead after a temple’s wall collapsed near a ghat during Chhath puja in Samastipur, today. State Disaster Response Force (SDRF) rescue operation underway. pic.twitter.com/4G1xZAThmJ
— ANI (@ANI) November 3, 2019
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लीला देवी (62) आणि बच्ची देवी (60) यांचा समावेश आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या इथे भिंतीचा कोसळलेला भाग हटवण्याचं कार्य सुरू आहे. या कोसळलेल्या भागाखाली अजूनही काही व्यक्ती अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.



























































