आमदार मोनिका राजळे यांनी केली नुकसानीची पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीची रविवारी आमदार मोनिका राजळे यांनी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यांनी पाथर्डी तालुक्यातील , पालवेवाडी,मोहोजदेवढे, जांभळी  तर शेवगाव तालुक्यातील चापडगाव, बोधेगाव यासह  विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन झालेल्या नुकसानाची पहणी केली. या वेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर, सोमनाथ खेडकर, सुभाष केकाण, मंडल आधीकारी गजानन घुले, नारायण पालवे उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती राजळे यांना दिली. दोन वर्षांपासून दुष्काळाने होरपळून निघाल्याचे सांगत गुरे कशीबशी छावण्यात जगवली.  यंदा कर्ज काढून पेरण्या केल्या. पिकेही चांगले उगवले होते, मात्र गेल्या होत पावसामुळे सर्व पिके उद्ध्वस्त झाले आहे. या नुकसानीची दखल घेते, आम्हाला न्याय मिळवून द्यावा, नुकसानाचे सरसकट पंचंनामे करुन शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी राजळे यांना केली. राजळे म्हणाल्या की, शेवगाव पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः कापूस,बाजरी, तुर,कांदे सडले आहे. शेतात पाणी साचले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिराऊन घेतला आहे. शेवगाव पाथर्डीमधील चाळीस हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शासनाने दोन दिवसांपूर्वीच पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, नुकसान एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले आहे की, सरसकट पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी अशी  शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी शासनाकडे त्वरीत पाठपुरावा करणार असून  जास्तीतजास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे  राजळे म्हणाल्या.