
धाराशीव येथे येत्या 10ते 12 जानेवारी या कालावधीत 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. साहित्य संमेलनातील एक अत्यंत लोकप्रिय असणारा ‘कविकट्टा’ हा उपक्रम साहित्य संमेलनाच्या तिन्ही दिवशी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नवोदित तसेच प्रस्थापित कवींना यामध्ये सहभागी होता येईल.
‘कविकट्टा’चे संयोजक राजन लाखे आहेत. ‘कविकट्टा’साठी आलेल्या कवितांपैकी साधारणतः पाचशे कवितांची निवड करून कवींना निमंत्रित केले जाणार आहे. कविता पाठविण्यासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत ‘कविकट्टा’साठी पाठविण्यात येणारी कविता स्वरचितच असावी. एका कवीने एकच कविता पाठवावी. कविता 20 ओळींपेक्षा जास्त नसावी. निवड समितीने निवडलेली कविता अंतिम असेल. कवीने स्वतःचा पत्ता, दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक, ई–मेल पानाच्या वरच्या बाजूला स्पष्ट अक्षरांत लिहावा. कविता पाठवण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. त्यासाठी पत्ता आहे– ‘93 के अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ संपर्क कार्यालय, आर्य समाज चौक, पोलीस ठाण्याजकळ, धाराशीव-413501 अथवा [email protected] या ई–मेल पत्त्यावरही कविता पाठविता येईल. अधिक माहितीसाठी 9892655526 / 8600333307 या क्रमांकावर संपर्क साधावा.





























































