
हिंदुस्थानचा धडाकेबाज युवा फलंदाज शुभमन गिलने यंदा देवधर करंडक अंतिम लढतीत इंडिया ‘सी’ संघाचे नेतृत्व करीत एक आगळा विक्रम साकारला. आता तो देवधर करंडकाच्या फायनलमध्ये एखाद्या राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद भूषवणारा हिंदुस्थानचा सर्वात कमी वयाचा कर्णधार ठरला. शुभमनने 20 वर्षे 57 दिवस या वयात नेतृत्व करीत 10 वर्षांपूर्वीचा विराट कोहलीचा विक्रम मोडला. विराटने 21 वर्षे 124 दिवस या वयात 2009-10 च्या हंगामात या स्पर्धेत उत्तर विभागाचे नेतृत्व केले होते.
आपल्या पहिल्या कर्णधारपदाच्या हंगामात गिलला आपल्या इंडिया ‘सी’ संघाला जेतेपद पटकावून देता आले नाही. त्यांना यंदा इंडिया ‘बी’ संघाकडून 51 धावांनी पराभव पत्करावा लागला.
सर्वात कमी वयात देवधर करंडक अंतिम लढतीत नेतृत्व
कर्णधार वय संघ हंगाम
- शुभमन गिल 20 वर्षे 57 दिवस इंडिया सी 2019-20
- विराट कोहली 21 वर्षे 124 दिवस उत्तर विभाग 2009-10
- उन्मुक्त चंद 22 वर्षे 310 दिवस इंडिया बी 2015-16
- श्रेयस अय्यर 23 वर्षे 92 दिवस इंडिया बी 2017-18
- मनोज तिवारी 23 वर्षे 124 दिवस पूर्व विभाग 2008-09
































































