सुप्रिया सुळेंकडून चंद्रकांत पाटील यांना नासलेल्या पिकांचा गुच्छ भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chandrakant-patil

अतिवृष्टीमुळे पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतंत्र पाहणी दौरा केला.

यावेळी दोघे समोरासमोर आले. पाटील यांच्यासमोरच शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी पावसामुळे नासलेल्या फळांचा आणि पिकांचा गुच्छ चंद्रकांत पाटील यांना भेट दिला. त्यांनी शेतकऱयांच्या समस्या यावेळी मांडल्या.