
कोल्हापुरात महापुराने नुकसान झालेल्या शेतकऱयांना कर्जमाफी मिळणार आहे. तर कर्ज न घेतलेल्या शेतकऱयांना नुकसानीच्या तिप्पट रक्कम मिळणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत ही रक्कम शेतकऱयांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना तहसीलदार आणि प्रांताधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत. शिवाय पूरग्रस्त छोटे-मोठे उद्योजक आणि नागरिकांच्या खात्यावर दि. 6 पर्यंत रक्कम जमा करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
मंगळवारी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली. यंदा महापुरामुळे कोल्हापूर जिह्यात मोठय़ा प्रेमाणात नुकसान झाले आहे. यात घर, घरगुती वापराच्या वस्तू यासह छोटे-मोठे उद्योग कारागीर यांचेही नुकसान झाले आहे. जनावरेही दगावली आहेत. या सर्वांची नुकसानभरपाई बँकांमार्फत ज्याच्या त्याच्या खात्यात जमा होणार आहे. यापूर्वी 90 टक्के रक्कम जमा झाली असून, उर्वरित भरपाईची रक्कम खात्यावर जमा करण्यासंदर्भात तहसीलदार आणि प्रांताधिकाऱयांना सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकारी देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणाऱया निधीचा संपूर्ण तपशील बुधवारी मिळणार असल्याचे त्यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.
78 हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त
कोल्हापूर जिह्यात सुमारे 78 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अंदाज पंचनाम्यातून समोर आले आहेत. यामध्ये ज्या पूरग्रस्त शेतकऱयांनी कर्ज घेतले आहे ते माफ करण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी कर्ज घेतले नाही, त्यांच्या झालेल्या नुकसानीची तिप्पट भरपाई देण्यात येणार आहे. कर्ज घेतलेल्या पूरग्रस्त शेतकऱयांची यादीची पडताळणी करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
























































