ओयो हॉटेल्सच्या संस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ओयो हॉटेल्स ऍण्ड होम्स’चा संस्थापक रितेश अग्रवाल आणि अन्य सहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओयोने महिन्याला 7 लाख रुपये या दराने भाडय़ाने खोल्या घेतल्या होत्या. मात्र गेल्या 5 महिन्यांचे 35 लाख रुपयांचे भाडे ओयोने दिलेच नसल्याचा गुन्हा एका हॉटेल व्यावसायिकाने पोलिसात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. बंगळुरू येथील डोमलर भागातील ‘हॉटेल रॉक्सेल इन’चे मालक बेट्स फर्नांडीस यांनी ओयो हॉटेल्सच्या संस्थापकाविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे. ओयो हॉटेल्सने त्यांच्या हॉटेलमधील खोल्या 7 लाख रुपये महिना या दराने घेतल्या होत्या. मात्र मे महिन्यापासून आतापर्यंत एकही पैसा मिळालेला नसल्याचे बेट्स यांनी आपल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.