
>>आकाश शिंदे, मुंबई
महात्मा गांधी यांची 150 व्या जयंती निमित्त साजरी होत आहे. तसेच महात्मा गांधी आणि मुंबई यांचे विशेष नातं आहे. गांधीजींनी ‘चले जाव’ची चळवळ मुंबईतून सुरू केली. गांधींजींच्या कार्याला आदरांजली वाहण्याच्या हेतुने हिंदुस्थानच्या टपाल संस्थेमार्फत ‘मुंबई आणि गांधी’ अशा समीकरणासह विशेष तिकीटे छापण्यात आली आहेत. गांधीजींच्या संदर्भातील पहिलं टपाल तिकीट 15 ऑगस्ट 1948 रोजी टपाल संस्थेमार्फत तिकीट छापण्यात आले होते. तसेच महात्मा गांधी यांची अनेक तिकीटे टपाल संस्थेमध्ये उपलब्ध आहेत.
टपाल सेवेमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे टपाल तिकीट. टपालच्या माध्यमातून जी तिकिटे छापली जातात त्या प्रत्येक तिकिटामागे इतिहास दडलेला असतो. अशाचा प्रकारे हिंदुस्थानच्या टपाल सेवेमार्फत यंदा महत्मा गांधी आणि महाराष्ट्रीतील विशिष्ट खाद्यपदार्थांचे टपाल तिकीट छापण्यात आले आहे. या निमित्ताने टपाल संस्थे मार्फत ‘गांधी आणि मुंबई’ अशा नावाने टपाल तिकिटांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, गांधीसंग्रालयाचे अध्यक्ष डॉ. उषा ठक्कर, महाराष्ट्र-गोवा टपाल संथेचे मुख्य अधिकारी हरिशचंद्र अग्रवाल आणि प्रसिद्ध शेफ संजीव कपूर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील वडापाव, मिसळ पाव, पुरणपोळी आणि मोदक हे चमचमीत पदार्थांची चव जगभर प्रसिद्ध आहे. या चमचमीत खाद्य पदार्थांना प्रोत्साहन मिळावं आणि महाराष्ट्राची ओळख जपावी या उद्द्येशाने हिंदुस्थानच्या टपाल सेवेने पुढाकार घेत तिकिटे छापली आहेत.
प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी उपस्थित होते. भगत सिंह कोश्यारी हे उद्घाटन सोहळ्यात बोलताना म्हणाले की, आजच्या प्रत्येक तरुणाकडे मोबाई फोन असल्यामुळे त्यांना संदेश पाठवण्यासाठी टपालची गरज भासत नाही. म्हणून टपालाद्वारे पत्र पाठवण्याची उत्सुकता माहीत नाही. म्हणून मी सर्व तरुणांना आवाहन करतो की त्यांनी एकदा तरी टपलाद्वारे पत्र पाठवा. मग तुम्हाला कळेल की, टपलाद्वारे पत्र पाठवण्यात मजा आहे, ती मोबाईलद्वारे संदेश पाठवण्यात नाही. म्हणून टपाल संस्थे मार्फत पत्र लिहिण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे त्यात सहभागी व्हा, असे अवाहन महाराष्ट्राच्या राज्यपालांनी केलं आहे.
आज आपण जी हिंदुस्थानची टपाल सेवा पाहातो त्याचा पाया 01 ऑक्टोबर 1854 साली लॉर्ड डलहौजी यांनी रचला होता. 19 व्या शतकात संदेश वहनासाठी टपाल सेवा हाच एक पर्याय उपलब्ध होता. कालांतराने मोबईल सेवेचा उगम झाला आणि त्या सेवाचा सर्वात मोठा फटका बसला तो म्हणजे टपाल सेवेला.




























































