प्रायव्हेट पार्टमधून सोडलं रॉकेट, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीने चक्क पार्श्वभागात फटाक्यातील रॉकेट लावलं. तर दुसऱ्यानं ते पेटवल्याचं दिसत आहे. व्हिडीओमधील व्यक्ती स्कॉटीश भाषा बोलत आहे. यामुळे हा व्हिडीओ स्कॉटलँडचा असल्याची चर्चा सुरू आहे. रॉकेटमधून निघालेल्या आगीमुळे तरुण भाजला आहे. पण त्याच नाव काय तो नक्की कुठला हे मात्र अद्याप कळालेले नाही.

या व्हिडीओत दोन तरुण दिसत आहेत. ते गार्डनमध्ये असून यातील एका तरुणाने पार्श्वभागात रॉकेट ठेवल्याचं दिसत आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या तरुणाने ते रॉकेट पेटवले. त्यानंतर रॉकेटवाला तरुण घाबरुन इकडे तिकडे पळताना व्हिडीओत दिसत आहे. मात्र याचदरम्यान रॉकेट फुटतं आणि तरुण जबर गंभीर जखमी झाला.

याबद्दल बोलताना रॉयल सोसाइटी फॉर द प्रिवेंशन ऑफ़ अॅक्सीडेंटच्या प्रवक्याने सांगितले की फटाके उडवण्यासठी आम्ही एक मार्गदर्शिका बनवली आहे. पण फटाक्यांचा हा व्हिडीओ बघून चिंता वाटली. अशा पद्धतीने फटाके उडवणे जीवावर खेळणे आहे.