कश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी, दोन जवानांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टीला सुरूवात झाली आहे. बर्फवृष्टीमुळे नागरिकांची हाल होत आहे. श्रीनगर विमानतळावरून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.

कश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे झालेल्या अपघातात सैन्याच्या दोन जवानांसह सहाजणांचा मृत्यू झाला आहे. श्रीनगरच्या लानगेट भागात सैन्याच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात सैन्याचे जवान भीम बहादुर आणि अखेलिश कुमार यांचा मृत्यू झाला आहे. बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-जम्मू महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे.

कुपवाडात हिमस्खलनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच श्रीनगर भागात विद्युत विभागातील दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. कश्मीरच्या राजौरी भागातील मुघल मार्ग पूर्णपणे बंद करण्यात अला आहे. त्यामुळे दोन हजार गाड्या अडकल्या आहेत. पुढील तासात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होऊ शकते असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.