स्वस्तातील सोन्याच्या बिस्किटाच्या नावाखाली सोनारांना लावायचे चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

स्वस्तात सोन्याचे बिस्किट देतो असे सांगून सोनारांना चुना लावणाऱया भामटय़ाच्या युनिट 12 ने मुसक्या आवळल्या आहेत. दीपक भीमराव शिंदे असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 20 खोटी सोन्याची बिस्किटे पोलिसांनी जप्त केली आहेत.  तक्रारदार हे व्यापारी आहेत. गेल्या आठवडय़ात ते झवेरी बाजारात गेले होते. तेव्हा दोन जण त्यांच्याकडे आले. आपल्याकडे स्वस्त दरातील सोन्याची बिस्किटे असल्याच्या भूलथापा मारल्या. विश्वास बसावा म्हणून भामटय़ाने तक्रारदारांना दोन सोन्याची खरी बिस्किट दाखवली. 30 हजार रुपये प्रति तोळा दराने सोन्याची बिस्किट देतो असे सांगून सांगून तक्रारदारांना मीरा रोड येथे भेटण्यास बोलावले.  मंगळवारी एका भामटय़ाने तक्रारदारांना 30 हजार ऐवजी 20 हजारांत सोन्याची बिस्किटे देतो असे सांगितले. हा प्रकार तक्रारदारांना संशयास्पद वाटला. ते सोने चोरीचे असावे असे तक्रारदारांना वाटले. त्यांनी युनिट 12 चे ऑफिस गाठले. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर शिवलकर, सचिन गवस, अतुल आव्हाड, हरीश पोळ यांच्या पथकाने तपास सुरू केला.