पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, वॉर म्युझियममध्ये अभिनंदनचा कैद्याच्या रूपातील पुतळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा अपप्रचार करण्याची एकही संधी न सोडणाऱया पाकिस्तानची आणखी एक कुरापत उघड आली आहे. पाकिस्तानने वायुदलाच्या वॉर म्युझियममध्ये पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा कैद्याच्या रूपातील पुतळा उभारला आहे. पुतळ्याला पाकिस्तानी सैनिकाने घेरल्याचेही दाखवले आहे.

पाकिस्तानातील पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अन्वर लोधी यांनी ट्विटरवर वॉर म्युझियममधील अभिनंदन यांच्या पुतळ्याचे छायाचित्र आज पोस्ट केले. त्यामध्ये पुतळ्याच्या बाजूला एक कप ठेवलेला आहे. तसेच मागे सैनिक उभा असलेला दिसत आहेत. आपल्या पोस्टखाली लोधी यांनी लिहिले, ‘जर या पुतळ्याच्या हातात चहाचा कप दिला असता तर आणखी मजा आली असती.’

पाकिस्तानच्या कैदेत असताना अभिनंदन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यामध्ये अभिनंदन चहा पिताना दिसत होता. पाकिस्तानी अधिकाऱयांना ‘चहा चांगला आहे. धन्यवाद’ असे उत्तर त्यांनी दिले होते. हा संदर्भ देऊन लोधी यांनी पोस्ट लिहिली आहे.