
सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी रामजन्मभूमी प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असून त्या जागेवर मंदिर बांधण्यात यावे आणि मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी इतरत्र पाच एक जमीन देण्यात यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला. या निर्णयाचे देशभरातील हिंदू-मुस्लीम समाजाने स्वागत केले आहे. मात्र वादग्रस्त बंगाली लेखिका तस्लिमा नसरींन यांनी एक सवाल केला आहे.
मंदिर वहीं बनेगा! अयोध्या प्रभू श्रीरामाचीच! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
तस्लिमा नसरीन यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर ट्वीट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अयोध्येतील वादग्रस्त 2.77 एकर जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर इतरत्र 5 एकर जागा मशीद बांधण्यासाठी द्यावी, असे निर्देश देण्यात आले. या निर्णयावर नसरीन यांनी ट्वीट कतरताना म्हटले की, ‘2.77 एकर जमीन हिंदूंना मंदिरासाठी देण्यात आली आहे. तर मुस्लिमांनाही मशिदीसाठी 2.77 एकर जागा दिली जायला हवी होती. त्यांना 5 एकर जमीन का?’. नसरीन यांच्या या ट्वीटला संमिश्र प्रतिसाद मिळत असून अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल त्यांना ट्रोलही केले आहे, तर काहींनी त्यांचा हा सवाल योग्य असल्याचे म्हटले आहे.
2.77 acres of land for Hindus. 2.77 acres of land should be for Muslims. Why 5 acres for them?
— taslima nasreen (@taslimanasreen) November 9, 2019
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने अयोध्येचा ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील ‘ती’ जागा हिंदूंची असून रामजन्मभूमीच्या जागेवरच मंदिर उभारावे. त्यासाठी ट्रस्ट स्थापन करावे असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. त्यामुळे ‘मंदिर वहीं बनेगा’ हे कोटय़वधी जनतेचे स्वप्न प्रत्यक्षात आता आले आहे. हा निर्णय देतानाच अयोध्येत मशिदीसाठी पाच एकर जागा द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. गेल्या 134 वर्षांपासून सुरू असलेला न्यायालयीन लढा आता संपला आहे. दरम्यान, या निकालाकडे देशाचेच नाही, तर अवघ्या जगाचे लक्ष होते. या निकालाचे सर्वच राजकीय पक्षांनी, विविध समूहांनी स्वागत केले असून अयोध्येसह देशभरात शांततेचे वातावरण आहे.






















































