माजी प्रियकराने फेसबुकवर ‘अशी’ पोस्ट टाकली आणि प्रेयसीचं लग्न मोडलं..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
facebook-friend-1

फेसबुक किंवा तत्सम सोशल मीडियाचा वापर अनेकजण मनातल्या गोष्टी इतरांशी शेअर करण्यासाठी करतात. त्यातून कधीकधी भलतंच काहीतरी घडू शकतं. असंच एका फेसबुक पोस्टमुळे एका तरुणीचं ठरलेलं लग्न मोडलं आहे.

नोएडा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचे सिलारपुर येथील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र, काही काळापूर्वीच तिने त्याच्याशी नातं तोडलं होतं. पण तो तरीही तिचा पिच्छा पुरवत होता. तिचं लग्न दुसरीकडे निश्चित झालं होतं. ही गोष्ट माजी प्रियकराला समजली आणि त्याने त्याच्या फेसबुकवर तिला टॅग करून एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत लिहिलं होतं.

ही पोस्ट व्हायरल होऊन तरुणीच्या वाग्दत्त वरापर्यंत पोहोचली. त्याने त्वरित तिच्याशी ठरलेलं लग्न मोडत असल्याचं जाहीर केलं. माजी प्रियकराच्या अशा वागण्याने संतापलेल्या तरुणीने पोलिसात तक्रार केली आहे. पोलिसांनी तरुणीची तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.