
जयपूरमधील प्रसिद्ध सांभर सरोवरात गेल्या 15 दिवसांत 10 हजार देशी-परदेशी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसांत पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण इतके वाढले आहे की, या पक्ष्यांचे अवशेष जमिनीत पुरण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागत आहे. काही पक्ष्यांचे मृतदेह पाण्यात कुजले आहेत. दरम्यान, पक्ष्यांच्या मृत्यूचे गूढ कायम असून पक्ष्यांना वाचवण्यासाठी आणखी एक रेस्क्यू सेंटर उघडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
सांभर सरोवरात देशी-परदेशी पक्षी दरवर्षी येत राहतात. मात्र, यावेळी सरोवरात उतरलेल्या पक्ष्यांचा एकामागून एक मृत्यू होऊ लागला आहे. याची दखल घेत राज्यातील विविध पक्षीतज्ञांनी सांभरला भेट देऊन त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याची गंभीर दखल न्यायालयाने स्वतःच याचिका दाखल करून घेत राज्य सरकारला या संपूर्ण प्रकरणावर अहवाल करायला सांगितले होते. पक्ष्यांचे हे मृत्यू व्हायरल इन्फेन्शनमुळे होत असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.
राज्य सरकारने न्यायालयाला सादर केलेल्या अहवालात पक्ष्यांचा मृत्यू हा व्हायरल इन्फेक्शन आणि जीवाणूंच्या संसर्गामुळे झाला आहे. त्याचबरोबर हे परदेशी पक्षी मोठे अंतर कापूर येत असल्यामुळे उपासमार, प्रदूषणामुळे दुबळे झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असे म्हटले आहे.
जे पक्षी सुरुवातीला मेले, ते तलावातील दलदलीत गाडले गेले. ते कुजल्यामुळे त्यात कीडे पडले. हे कीडे दुसऱया पक्ष्यांनी खाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र, पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण बर्ड फ्ल्यू नाही, असे सांगण्यात येत आहे.
काही पक्षी तज्ञांच्या मते, ही घटना ‘हाईपर नकट्रेमिया’ म्हणजे पाण्यात सोडीयमची मात्रा अधिक झाल्यामुळे पक्ष्यांना नशा झाली आणि ते मेले.
वन विभागाकडे या संदर्भातले तज्ञ, प्रयोगशाळा, साधनसामग्री नाही.
काहींच्या मते, पक्ष्यांच्या पंख्यांना लकवा झालेला आढळला. त्यामुळे मृत्यूचे कारण लकवा असावा.

























































