25 नोव्हेंबरला तहसील कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयावर शिवसेना मोर्चा काढणार आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले जाणार आहे. अशी माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25,000 रुपये मदत तातडीने देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येईल. मोर्चानंतर तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी या रकमेतून कोणत्याही प्रकारच्या कर्जाची कपात केली जाऊ नये. शेतकऱ्यांना तत्काळ पिक विम्याच्या रकमेचे वाटप करावे या मागणीसाठी हा मोर्चा असल्याचे त्यांनी सांगितले.