
शिरूर तालुक्यात मोटार सायकल चोरांनी मोठाच धुमाकुळ घातला होता. यातील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी यांच्याकडून चोरीच्या १९ दुचाकी जप्त केल्या आहेत. अनिल विठठ्ल वेताळ आणि आकाश बबन चित्तर अशी या चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी या चोरट्याना गजाआड केल्याने जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याप्रकरणी अनेकांनी दुचाकी चोरीची तक्रार पोलिसात नोंदवली होती. पोलीस या दुचाकी चोरांचा शोधे घेत असताना हे दोन चोरटे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत अनेक दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी यांच्याकडून १९ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. या दुचाकींची किंमत दहा लाख ६७ हजार रुपये इतकी आहे





























































