अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग, जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी येथील संभाजी कोंडीबा सरोदे (जामखेड) या शिक्षकाने त्यांच्याच शाळेतील एका नऊ वर्षांच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनी सोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी विनभंगाचा गुन्हा दाखल करून त्या शिक्षकाला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी शिक्षक संभाजी कोंडीबा सरोदे (जामखेड) हा धोंडपारगाव येथील दत्तवाडी शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. शनिवार 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आरोपी शिक्षक संभाजी सरोदे हा नान्नजहून जामखेडकडे चारचाकी गाडीने येत होता. यावेळी राजेवाडी फटा येथे त्यांच्या धोंडपारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी येथील एक इयत्ता चौथी मधिल विद्यार्थिनी रस्त्याच्या बाजूला घरासमोर खेळत होती. यावेळी या शिक्षकाने त्या विद्यार्थिनीस हाक मारली आपले शिक्षक बोलवत आसल्याने ती विद्यार्थिनी विश्वासाने त्याच्या बरोबर गेली. यावेळी त्याने विद्यार्थिनीस चारचाकी गाडीत बसवले व राजेवाडी गावच्या शाळेकडे जाणार्‍या रोडवर तसेच राजेवाडी येथील शाळेत घेऊन गेला. त्या ठिकाणी मोबाईल मधील अश्लील व्होडीओ दाखवले व तिचा विनयभंग केला. या नंतर सदरची घटना या मुलीने आपल्या घरच्यांना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याच वेळी आरोपी शिक्षक हा गाडीसह पळून जात आसताना ग्रामस्थांनी त्यास पकडले व चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडित मुलीच्या चुलत्याने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2012 च्या कलम नुसार शिक्षक संभाजी सरोदे याच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असुन श्रीगोंदा येथिल न्यायालय हजर केले असता न्यायालयाने त्यास 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटनास्थळी उद्या सकाळी जाऊन घडलेल्या प्रकाराची चौकशी करणार आहे. तसेच त्याठिकाणी आसलेल्या लोकांचे जबाब नोंदवून घेतले जाईल. व प्रारंभिक अहवाल तयार करून हा अहवाल वरीष्ठांना पाठवण्यात येईल व संबंधित शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे सांगितले.