
जम्मू आणि कश्मिरातील कलम 370 हटविल्यानंतर प्रमुख पक्षांच्या नेत्यांना स्थानबद्द केले आहे. या नेत्यांना ठेवण्यात आलेल्या आमदार वसतीगृहाची शनिवारी झडती घेतली असता त्यांच्याकडून 11 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी आज दिली.
आमदार निवासाचे प्रशासनाने उपकारागृहात रुपांतर केले आहे. तुरुंग नियमांनुसार प्रशासनाने आमदार वसतीगृहाची शनारी तपासणी केली. स्थानबद्धांकडे मोबाईल फोन असल्याची खबर मिळाल्यावर ही शोध मोहिम राबविण्यात आली. सुरक्षा रक्षकांना स्थानबद्द नेत्यांच्या खोलीची तपासणी केली आणि सुरक्षा रक्षकांना मोबाईल फोन आढळून आले. या उपतुरुंगात मोबाईल फोन कसे आले, याचा तपास तुरुंग प्रशासन करीत आहे.
कलम 370 रद्द करून जम्मू आणि कश्मिरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केल्यावर सुमारे 30 हून अधिक नेत्यांना स्थानबद्द करण्यात आले. कडाक्याच्या थंडीमुळे श्रीनगरातील सेटाँर हॉटेलातून या स्थानबद्धाना एम. ए. रोडवरील आमदार वसतीगृहात नुकतेच हलविण्यात आले.
























































