बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरात दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. मंगळवारी अनंतनाग जिह्यात एका गावामध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱयांवर दहशतवाद्यांनी ग्रेनाईड हल्ला करीत बेछूट गोळीबार केला. यात अतिरिक्त आयुक्त आणि सरपंचाचा मृत्यू झाला.

370 कलम हटविल्यानंतर जम्मू-कश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला आहे. नायब राज्यपाल जी. सी. मुर्मु यांनी ‘बॅक टू व्हिलेज’ हा सरकारी कार्यक्रम सुरू केला आहे. प्रशासकीय अधिकाऱयांनी गावागावात जाऊन गावकऱयांशी संवाद साधावा. सरकारी योजनांची माहिती द्यावी, असा हा उद्देश आहे.
मंगळवारी अनंतनाग जिह्यातील बडाजगाम गावात हॉर्टिकल्चर विभागाचे अतिरिक्त उपायुक्त जाहूर अहमद शेख यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱयांचे एक पथक गेले होते. सरपंच आणि गावकऱयांशी चर्चा सुरू असताना दहशतवादी घुसले आणि बेछूट गोळीबार केला. यात अतिरिक्त उपायुक्त शेख आणि सरपंच रफीक राहा हे जखमी झाले. सरकारी कर्मचारी मन्सूर पैरे यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, ‘बॅक टू व्हिलेज’ या सरकारी मोहिमेला आता धक्का बसला आहे. विशेषतः दक्षिण कश्मीरात दहशतवादी कारवाया सुरूच आहेत.

विद्यापीठाजवळ ग्रेनाइड हल्ला
श्रीनगरातील कश्मीर विद्यापीठाच्या सर सईद गेटजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनाईड हल्ला केला. हल्ला झाला तेव्हा अनेक विद्यार्थी, लोक गेटजवळ होते. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत.