
पाकिस्तानविरुद्ध अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात डेव्हीड वॉर्नर याने नाबाद त्रिशतक ठोकले. परंतु ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केल्याने वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याचा 400 धावांचा विक्रम मोडण्याचे स्वप्न वॉर्नर पूर्ण करू शकला नाही. मात्र लाराचा हा विक्रम एक हिंदुस्थानी फलंदाज नक्की मोडेल असा विश्वास वॉर्नरने व्यक्त केला आहे.
नाबाद त्रिशतक ठोकल्यानंतर डेव्हीन वॉर्नरने ‘फॉक्स स्पोर्ट्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने आपल्या खेळीचे अनेक पैलू उघड केले आणि लाराचा विक्रम कोण मोडू शकेल याबाबतही आपले मत व्यक्त केले. ‘मला असे वाटते की हे खेळाडूवर अवलंबून आहे. आमच्या (ऑस्ट्रेलियामध्ये) येथे बाऊन्ड्री मोठी आहे, त्यामुळे कधी-कधी गोष्टी कठिण होतात. मोठी खेळी करताना थकवा जाणवतो, तेव्हा जास्त प्रयत्न करावे लागतात आणि मोठे शॉट खेळणे अशक्य होऊन जाते’, असे वॉर्नर म्हणाला.
ICYMI https://t.co/yDy15ulvUx
— ICC (@ICC) November 30, 2019
तो पुढे म्हणाला की, शेवटी-शेवटी मी वेगाने धावा जमवण्यासाठी दोन-दोन धावा घेण्याचाही प्रयत्न केला. कारण चेंडू सीमारेषेबार जाईस अथवा नाही याबाबत मला शंका होती. तसेच भविष्यामध्ये ब्रायन लारा याचा विक्रम मोडण्याची क्षमता टीम इंडियाचा खेळाडू रोहित शर्मा याच्याकडे आहे, असेही वॉर्नर म्हणाला.
“He said I will be a better Test player than Twenty20 player.”
David Warner was meant to be a T20 specialist. Virender Sehwag told him otherwise.
https://t.co/wOUBlV1zlM pic.twitter.com/03j4PqJJlA
— Fox Cricket (@FoxCricket) December 1, 2019
वॉर्नरची तुफानी खेळी
डेव्हिड 33 वर्षीय डेव्हिड वॉर्नरने 21 व्या षटकातील तिसऱया चेंडूवर षटकार ठोकून 308 धावसंख्येपर्यंत पोहोचून गुलाबी चेंडूवर सर्वाधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम केला. त्याच्या आधी पाकिस्तानच्या अझहर अलीने वेस्ट इंडीजविरुद्ध ऑक्टोबर 2016 साली नाबाद 302 धावांची खेळी करून गुलाबी चेंडूवर पहिले त्रिशतक ठोकले होते. याचबरोबर ऍडलेड मैदानावर तिहेरी शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला. याआधी 1932 साली डॉन ब्रॅडमन यांनी या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 299 धावांची खेळी होती. ब्रॅडमन यांचा विक्रम शनिवारी वॉर्नरने मोडीत काढला. वॉर्नरने आपल्या 335 धावांच्या नाबाद खेळीत एका षटकारासह 39 चेंडू सीमापार पाठविले.





























































