सार्वजनिक शौचालयात विवाहितेचा विनयभंग, आरोपी फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव सार्वजनिक शौचालयात तरुणीचा हात पकडून तिचा विनयभंग करणाऱ्याचा कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी शोध घेतला मात्र तो फरार झाला होता. अनिल मच्छिंद्र सोळसे असे संशयिताचे नाव असल्याची माहिती पीडित विवाहितेने पोलिसांना दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोळसे हा कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे राहतो. पीडित विवाहिता मंगळवारी दहा रोजी सायंकाळी पाच वाजता दहेगाव बोलका येथील सार्वजनिक शौचालयात गेली असता सोळसे तेथे आला. त्याने शौचालयाचा दरवाजा लोटून उघडून तिचा डावा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. दरम्यान, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.