हे म्हणजे नागरिकत्वाची नोटबंदी, प्रशांत किशोर यांची भाजपवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जदयूचे उपाध्यक्ष आणि निवडणुकीचे रणनितीकार प्रशांत किशोर भाजपवर टीका केली आहे. एनआरसी देशभरात लागू करणे म्हणजे ही नवी नोटबंदी असल्याचे ते म्हणाले आहे. तसेच यात गरीब आणि विस्थापितांनाना त्रास होणार आहे असेही किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर यांनी ट्विट करून म्हटले की, “देशभरात एनआरसी लागू करणे म्हणजे ही नवीन नोटबंदी आहे. जोपर्यंत तुम्ही सिद्ध करत नाही तोपर्यंत ते बेकायदेशीर असणार आहे. यामुळे फक्त गरीब आणि विस्थापितांची फरफट होणार आहे हा आतापर्यंतचा इतिहास आहे.”