केरळमध्ये अभाविप आणि कम्युनिस्ट विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व कायद्यावरून केरळमध्ये भाजप आणि कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी संघटनांमध्ये मारहाण झाली आहे. केरळच्या श्री केरळ वर्मा कॉलेजमध्ये ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे.

देशभरात नागरिकत्व कायद्यावरून गदारोळ सुरू आहे. तेव्हा सोमवारी या कायद्याबाबत गैरसमज दूर करण्यासाठी विद्यार्थी परिषदेने एका कार्यक्रमाचे आयोजन श्री केरळ वर्मा कॉलेजमध्ये केले होते. कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी संघटना स्टुडेंट्स फेडरेशचे विद्यार्थीही तिथे पोहोचले. त्याठिकाणी दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली. आज विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजमध्ये आंदोलन पुकारले होते. तिथेही दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी फेडरेशनच्या चार विद्यार्थ्यांना मारहाण केली. दरम्याच दोन्ही घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.