
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेसंदर्भातील सुनावणी पतियाळा न्यायालयाने 7 जानेवारी पर्यंत पुढे ढकलली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे निर्भयाची आई आशा देवी या दु:खी झाल्या असून न्यायालयात सुनावणीदरम्यानच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. न्यायालयाबाहेर येऊन निर्भयाच्या आईने त्यांची नाराजी व्यक्त करत न्यायालयाला फक्त दोषींचे अधिकार दिसतात आमचे नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.
Court to Mother of 2012 gangrape victim: Have full sympathy with you. We know someone has died but there are their(convicts) rights too. We are here to listen to you but are also bound by the law. https://t.co/KVl68DZEm8
— ANI (@ANI) December 18, 2019
न्यायालयाने निर्भयाच्या आईची समजूत काढताना आम्ही तुमचं दुख समजू शकतो मात्र आम्हाला कायद्याच्या चौकटीतच राहूनच निर्णय घ्यावा लागतो. ‘आम्हाला तुमच्याबाबत संपूर्ण सहानभूती वाटते. आम्हाला कळतंय की यात कुणाचा तरी जीव गेला आहे. पण दोषींचे देखील काही अधिकार आहेत. आम्ही तुमचं ऐकण्यासाठी बसलेलो आहोत. पण आमचे हात कायद्याने बांधलेले आहेत’, असे न्यायालयाने निर्भयाच्या आईला सांगितले.
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: The court has given them (convicts) to time to seek remedy. Court is only looking at their (convicts) rights and not ours. There is no guarantee that a judgement will be given on next date of hearing. pic.twitter.com/Yk6ZmQRLJH
— ANI (@ANI) December 18, 2019
‘न्यायालयाने दोषींना बचावासाठी वेळ दिला आहे. न्यायालय फक्त त्यांच्या अधिकारांकडे बघतेय, आमच्या अधिकारांचं काय? पुढच्या सुनावणीत देखील निकाल येईल याची बिलकुल खात्री नाही’, असे निर्भयाच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.





























































