
रोखठोकपणे विचारलेले प्रश्न आणि त्यांची तितकीच पॉवरफुल उत्तरं अशी दमदार पर्वणी येत्या 29 डिसेंबर रोजी अनुभवायला मिळणार आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत 29 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप सराटी हे गेली काही वर्षं कोथरूड साहित्य संमेलनाचे आयोजन करतात. यंदा होणाऱ्या या साहित्य संमेलनात शरद पवार यांची विशेष मुलाखत असणार आहे आणि ही मुलाखत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत घेणार आहेत.
























































