डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांचा मुलगा गुरुवारी अमेरिकेहून पुण्यात परतू शकत नसल्यामुळे गुरुवारी होणारा अंत्यसंस्कार विधी शुक्रवारी सकाळी होणार असल्याचे कुटुंबीयांतर्फे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. डॉ. श्रीराम लागू यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी रात्री राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्यांचा मुलगा आनंद लागू हे अमेरिकेहून येण्यास अधिक वेळ लागणार असल्याने अंत्यविधी शुक्रवारी (दि. 20) सकाळी करण्यात येणार आहे.