
मराठवाडा हा प्रदेश मागास आहे, असे म्हणने मला अमान्य आहे, कारण या भागात कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वाची खाण आहे, हे पावलोपावली देश-परदेशात सिद्ध होत आहे. येथील कर्तृत्वान तरुण परदेशात पाहायला मिळतात असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले आहेत.
महात्मा गांधी मिशन संस्थेचे संस्थापक सचिव शिक्षणमहर्षी अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील हे होते. याप्रसंगी माजी शिक्षण मंत्री, एमजीएम चे अध्यक्ष कमलकिशोर कदम, अनुराधा अंकुशराव कदम, माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाड्यात सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे व्यक्तिमत्व आहेत, असे शरद पवार म्हणाले. तसेच ही मंडळी शिक्षणाच्या माध्यमातून चांगली तरुण पिढी घडवण्यासाठी आपले योगदान देत आहेत. यामध्ये महात्मा गांधी मिशन संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, सचिव अंकुशराव कदम यांचा प्रमुख्याने उल्लेख करावे लागेल. कदम बंधु आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एमजीएम माध्यमातून घडलेली तरुण पिढी आज विविध क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व व सिद्ध करीत आहे. याविभागात शिक्षण घेतलेली तरुण पिढी देश-परदेशात पाहायला मिळताहेत, हे वास्तव चित्र लक्षात घेतल्यानंतर मराठवाडा मागासलेला आहे असे म्हणणे आपल्याला पटत नाही, असे शरद पवार म्हणाले. राजकारणात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते उद्धवराव पाटील यांनी आपल्या आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. परंतु महाराष्ट्राने त्यांना योग्य न्याय दिलेला नाही ही अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.



























































