
मुंबई जिल्ह्यासह हाऊसिंग फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक विशाल कडणे यांनी एका फोन कॉलने महाराष्ट्र सोसायटी वेल्फेयर असोसिएशनची फसवेगिरी उघड केली आहे. फोन कॉल्स करून लोकांना सभासदत्व घेण्यासाठी खोटे सांगितले जात आहे. एमएसडब्लूएचे सभासदत्व घेणे अनिवार्य आहे, असे सांगतिले जात आहे. कोणत्या कायद्यानुसार सभासदत्व घेणे अनिवार्य आहे, असे विचारल्यावर एमएसडब्लूएच्या प्रतिनिधीने कोणतेही उत्तर न देता फोन कट केला. या संभाषणाची ऑडिओ क्लिप रेकॉर्ड असून याबाबत अधिक तपास करण्यासाठी या प्रकरणाची तक्रार मुंबई पोलीस आणि विभागीय निबंधकांकडे करण्यात आली असल्याचे विशाल कडणे यांनी सांगितले.





























































