‘बायोनिक वुमन’ ने हातातच इंम्प्लांट केली घराची किल्ली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंत्रज्ञान दररोज नवनवे टप्पे पार करत आहे. अशातच अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने वेगवेगळी कामे करण्यासाठी आपल्या शरीरात चिप इंम्प्लांट केल्या आहेत. या महिलेला ‘बायोनिक वूमन’ म्हटले जात आहे. विंटर म्राज असे या महिलेचे नाव आहे. एका वृतवाहनीला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, तिच्या हातात दोन चिप इंम्प्लांट करण्यात आल्या आहेत. त्यातील एका चिपचा उपयोग तिच्या घराचा दरवाजा उघडण्यास होतो, तर दुसऱ्या चिपचा वापर ती बिजनेस कार्ड सारखा करते. इतकेच नाही तर, तिच्या हाताच्या बोटांमध्ये मॅग्नेट आणि एका बाजूला दोन फ्लश लाइट्सही इंम्प्लांट करण्यात आले असल्याचं तिने सांगितलं आहे. आपलं जीवन अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यास तिने असं केल्याचं सागितलं आहे.

विंटर म्राजची बायोनिक वुमन बनण्याची सुरुवात एका कार अपघातानंतर झाली. याबाबत बोलताना तिने सागितलं की, या अपघातात तिची मान, गुडघा आणि तळपायाला गंभीर दुखापत झाली होती. याच दरम्यान तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या होत्या. तिच्या गुडघ्यांपैकी एक थ्री डी प्रिंट केलेला आहे. अनेक शस्त्रक्रियेनंतर आयुष्य सुलभ करण्यासाठी तिने आपल्या शरीरात चिप इंम्प्लांट करण्याचा विचार केला.

विंटरने सांगितलं की, डाव्या हातात असलेल्या मायक्रोचिपचा वापर ती घरचा दरवाजा उघडण्यासाठी, तसेच ती काम करत असलेल्या ठिकाणी सुरक्षा कार्ड म्हणून करते. दुसरी चिप तिच्या उजव्या हातात आहे. या चिपचा वापर ती बिजनेस कार्ड सारखा करते. तिला तिच्या शेजाऱ्याने शरीरात चिप लावण्याचा सल्ला दिला होता.

bionic-woman