
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीत केलेल्या आंदोलनात भीम आर्मी प्रमुख चंदशेखर आझाद यांना अटक करण्यात आली. ही अटक म्हणजे दिल्लीची निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून केलेले राजकीय स्वार्थासाठीचे नाटक आहे असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी जामा मशीद ते जंतर-मंतर असे आंदोलन केले. परवानगी नसताना हे आंदोलन केल्यामुळे त्यांना अटक करून 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. मात्र, चंद्रशेखर निवडणूक डोळय़ांसमोर ठेवूनच आंदोलन करतात आणि तुरुंगात जातात. त्याचा राजकीय लाभ उठवतात. आताही दिल्लीची निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून त्यांनी अटक करवून घेतली आहे, असा आरोप त्यांनी केला.




























































