अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या अध्यक्षपदी डॉ. मोनिषा घोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकन सरकारच्या एफसीसी अर्थात फेडरल कम्युकेशन्स कमिशनच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारीपदी हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन नागरिक डॉ. मोनिषा घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. एरीच बर्गर यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून या पदावर नियुक्ती होणाऱया त्या हिंदुस्थानी वंशाच्या पहिल्या अमेरिकन महिला अधिकारी ठरल्या आहेत. एफसीसीचे अध्यक्ष आणि हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन नागरिक अजित पै आणि संस्थेसाठी त्या अभियांत्रिकीशी संबंधित मुद्दय़ांवर सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. डॉ. घोष या 13 जानेवारीपासून पदभार स्वीकारणार आहेत.