अंधेरीत दोन गटांत हाणामारी; सहाजणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्ववैमनस्यातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत सातजण जखमी झाल्याची घटना शनिवारी अंधेरीच्या पंपहाऊस परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चारजणांना अटक केली.

अंधेरी पूर्वच्या पंपहाऊस येथे एक सोसायटी आहे. शनिवारी रात्री 9 च्या सुमारास दोन गटांत वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात सातजण जखमी झाले. हाणामारीची माहिती समजताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी गेले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हाणामारीच्या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. एमआयडीसी पोलिसांनी चारजणांना अटक करून न्यायालयात हजर केले. पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यावरून पोलीस पुढील तपास करणार आहेत.

टेम्पोचालक-दुचाकीस्वार भिडले
ओव्हर टेगिंकच्या कारणावरून भररस्त्यात टेम्पोचालक आणि दुचाकीस्वार एकमेकांबरोबर भिडल्याची घटना आज सकाळी महालक्ष्मी परिसरात घडली. दुचाकीस्वाराने मारहाण केल्याची तर टेम्पोचालक हेल्मेट व चार हजार घेऊन पळाला, अशी एकमेकांविरोधात तक्रार दोघांनी दिली. ताडदेव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

महालक्ष्मीच्या आंबेडकर भवन परिसरात अर्जुन यादव हा टेम्पो घेऊन तर आकाश सिंग (22) हा तरुण त्याच्या बुलेटवरून जात होता. गाडी पुढे-मागे नेण्याच्या कारणावरून अर्जुन आणि आकाश यांच्यात रस्त्यात वाद सुरू झाला. काही वेळाने आकाशने ताडदेव पोलीस ठाणे गाठून टेम्पोचालकाने माझे हेल्मेट व चार हजारांची रोकड चोरून नेल्याची तक्रार दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक फिरोज बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शहाजी शिंदे, एपीआय अरुण थोरात, उपनिरीक्षक काळे तसेच मांगळे, भोसले, फाळके, गोडसे आणि वडे या पथकाने घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा मिळालेल्या नंबरच्या आधारे पोलिसांनी टेम्पोचालक आणि त्याच्यासोबत असणारा साजीद कुरेशी या दोघांना पकडून आणले. मात्र आकाशने मारहाण केल्याचे अर्जुनने सांगताच पोलिसांनी आकाशविरोधातदेखील तक्रार घेऊन पुढील तपास सुरू केला.