#NRC वर्षभरापासून देशात डिटेंशन सेंटर्सची तयारी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीमध्ये (एनआरसी)नाव न आलेल्या लोकांना ठेवण्यासाठी देशात डिटेंशन सेंटर्स उभारण्याबाबतची तयारी वर्षभरापासून सुरू असल्याचे समोर आले आहे. त्याबाबची माहिती गृहमंत्रालयानेच जुलैमध्ये राज्यसभेत दिली होती असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

देशात डिटेंशन सेंटर्स उभारली जात आहेत ही अफवा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केले. त्या पार्श्वभूमीवर डिटेंशन सेंटर्सबाबत सरकारने जानेवारीमध्येच राज्यांना निर्देश दिले होते ही माहिती गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली होती असे सांगत काँग्रेसने त्यांचा दावा खोडून काढला आहे. तसेच आसामच्या गोलापाडा येथे तीन हजार लोकांना ठेवता येतील एवढय़ा क्षमतेचे डिटेंशन सेंटर उभारले जात असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने सप्टेंबरमध्ये दिले होते असे स्पष्ट करत जनतेने पंतप्रधानांच्या बोलवण्यावर कसा विश्वास ठेवावा असे काँग्रेसने म्हटले आहे.