
बीड शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न केले होते. रात्री ही आग आटोक्यात आली. यात इलेक्ट्रीकल वस्तू सोडता कोणतेही नुकसान झालेले नसल्याचे समोर आले आहे. अचानक आलेल्या हायव्होलटेजमुळे शॉक सर्किट झाली आणि आग लागली असे तपासात पुढे आले आहे.
शहरातील जालना रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला काल दुसऱ्या मजल्याला आग लागली. आग लागल्याचे वृत्त शहरात झपाट्याने पसरले. मोठी गर्दी बँकेच्या बाहेर गोळा झाली, अनेक तर्क वितर्क लावले गेले. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सोमवारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आगीची पाहणी केली. या आगीमध्ये कोणतेही कागदपत्र, पैसा, आणि बँकेचे महत्वाचे डॉक्युमेंट आगीत जळाले नसल्याचे समोर आले. या आगीमध्ये इलेक्ट्रीकल वस्तू जळून खाक झाल्या. कॉम्प्युटर आणि डाटा नाहीसा झाला. मात्र हा डाटा बँकेच्या वरिष्ठ बँचमध्ये साठवून ठेवलेला असतो. त्यामुळे बँकेच्या भिंती काळ्या पडल्या. एवढेच नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सायंकाळच्या सुमारास आणि रविवार असल्यामुळे बँक बंद होती. ठराविक कर्मचारी काम पूर्ण करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही बँकेत काम करत असतात. ते कर्मचारी आपल्या कामात व्यस्त असताना हायव्होलटेज निर्माण झाले आणि त्या परिसरातील बहुतांश ठिकाणी इलेक्ट्रीकल नुकसान झाले. बँकेत कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रीकल वस्तू जळाल्या. या इमारतीला आग लागली. असे तपासात समोर आले आहे.
































































