
दरवर्षीप्रमाणे या वर्षी सर्वात खराब म्हणजे सहज हॅक होणाऱ्या पासवर्डची यादी जाहीर झाली आहे. या वर्षातही या यादीत 2018 प्रमाणे 123456 हा पासवर्ड क्रमांक एकवर आहे. हा असा पासर्ड आहे, जो सहज कोणीही हॅक करून तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, मेल अकाऊंट, अॅप किंवा इतर माहितीचा अॅक्सेस मिळवू शकतो. त्यामुळे या यादीतील कोणतेही पासवर्ड असलेल्यांनी ते बदलून सुरक्षित असलेले पासवर्ड निवडल्यास हॅक होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
या यादीत 123456 हा क्रमांक एकवर आहे. तर password हा पासवर्ड पहिल्या पाचमध्ये आहे. या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचाही पासवर्ड आहे. Donald हा पासवर्ड 33 व्या क्रमांवर आहे. डेटा मॅनेजमेंट कंपनी स्पॅशडाटाकडून दरवर्षी सर्वात खराब पासवर्डची यादी जाहीर करण्यात येते. या वर्षाची यादी जारी करताना 50 लाख पासवर्डचा अभ्यास करण्यात आला. हे पासवर्ड डेटालीकदरम्यान हॅक झाले होते. त्या आधारावर दरवर्षी ही यादी जारी करण्यात येते. या यादीतील पासवर्ड कोणी ठेवले असल्यास त्यांनी सुरक्षित पासवर्ड ठेवावा, यासाठी ही यादी जारी करण्यात येते. ज्या पासवर्डमध्ये कपिटल, स्मॉल, अंक आणि प्सेशल कॅरक्टर असतात, तो सर्वात सुरक्षित पासवर्ड समजला जातो. जनरेटर टूलची मदत घेऊनही सुरक्षित पासवर्ड बनवता येतो.
2019 या वर्षातील सर्वात खराव पासवर्डच्या यादीतील पहिले 25 पासवर्ड पुढीलप्रमाणे आहेत.
- 123456
- 123456789
- qwerty
- password
- 1234567
- 12345678
- 12345
- iloveyou
- 111111
- 123123
- abc123
- qwerty123
- 1q2w3e4r
- admin
- qwertyuiop
- 654321
- 555555
- lovely
- 7777777
- welcome
- 888888
- princess
- dragon
- password1
- 123qwe
























































