
ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी देश विदेशातून लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. स्थानिकांबरोबर पर्यटकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असा संदेश वाहतूक पोलिसांनी सांताक्लॉजच्या वेषात दिला दिला आहे. वाहतूक पोलीस नेहमी नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल करतात. मात्र, मंगळवारी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला वाहतूक पोलीस सांताक्लॉजच्या वेशात रस्त्यावर उतरले होते. पणजीमध्ये वाहतूक नियम भंग करणाऱ्यांना चलन फाडून दंड करण्याऐवजी वाहतूक नियम पाळून जीवन सुरक्षित बनवा,असा संदेश सांताक्लॉजच्या वेशातील पोलिसांनी दिला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील वाहतूक पोलिसांच्या या उपक्रमची दखल घेऊन त्यांचे कौतूक केले आहे.



























































