ट्रॅव्हल्स- स्विफ्ट कार अपघातात परभणीच्या उपप्राचार्यांसह तिघे ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव वेगाने जाणाऱ्या परभणी- पुणे ट्रॅव्हल बसची स्विफ्ट कारला धडक बसून गंगामसला येथे भीषण अपघात झाला आहे. मंगळवारी रात्री हा भीषण अपघात झाला असून त्यात गाडीतील तीन जण मृत्युमुखी पडले आहेत. मृतांमध्ये परभणीच्या शिवाजी कॉलेजचे उपप्राचार्य विनायक जावळे व त्यांची सीए असलेली मुलगी रुपाली हिचा समावेश आहे.

परभणी येथील स्विफ्ट डिझायर कार क्र. एम एच 14-जियु-2731मधून आळेफाटा पुणे येथून आपले काम आटोपून परत परभणी येथे जात होते. रात्री साडेअकरा वाजता गंगामसला येथील अजित नॅशनल शाळेजवळ परभणी येथून पुणे येथे जात असलेली ट्रॅव्हल बस क्र. एम एच 22-8899ची जोरदार धडक गाडीला बसली. या अपघातात कारमधील परभणीच्या शिवाजी कॉलेजचे निवृत्त प्राचार्य विनायक जावळे व त्यांची मुलगी रुपाली (24) हे जागीच ठार झाले तर चालक विजय ज्ञानेश्वर कानडे (रा.पिंपळगाव गायके ता. जिंतूर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

यातील मृतांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. मृताचे शवविच्छेदन डॉ.दीपाली त्रिमुखे यांनी डॉ.अनिल परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.