
शेतकरी लोकांच्या आयुष्यात गोडवा वाटत असतो. तो गोडवा वाटत असताना त्याच्या आयुष्याचे चिपाड होता कामा नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.
साखर उद्योग हा शेतकऱ्यांचा कणा. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे. शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार- मांजरी (पुणे) येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही pic.twitter.com/V333rTwSx4
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 25, 2019
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी ऊस पिकवतो. तो गोडवा वाटत असतो. हा गोडवा वाट असताना त्याच्या आयुष्याचे चिपाड होता कामा नये. जर तो होत असेल तर अशा कार्यक्रमाला अर्थ नाही. ऊसातून साखर मिळते, इथेनॉल मिळतं आणि उरलेल्या चिपाडातून वीज निर्मितीही होते.” असे संशोधन करणारी संस्था माझ्या महाराष्ट्रात आहे याचा मला स्वाभिमान आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सध्या दोन लाखापर्यंत शेतकर्यांना आपण कर्जमाफी दिली आहे. पुढे दोन लाखांच्यावर ज्या शेतकर्यांवर कर्ज आहे त्यांनाही दिला देऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. वसंतदादा सुगर इन्स्टिट्यूटची शाखा मराठवाड्यात सुद्धा सुरू होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. पुढच्या कॅबिनेटमध्ये या निर्णयाची फाईल मंजूर करून घेऊ असेही मुख्यमंत्री म्हणाले.






















































