#GOODBYE2019 या जीवघेण्या खेळांनी घातला धुमाकूळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2019या वर्षात ऑनलाईन गेम्सने धुमाकूळ घातला. या वर्षभरात पबजी, मोमो चॅलेंज आणि ब्ल्यू व्हेल या खेळांनी अनेकांचे प्राण घेतले.

ब्ल्यू व्हेल – 

blue-whale-in-blood
अनेक अल्पवयीन मुलांना आत्महत्या करण्यास भाग पाडणारा ब्ल्यू व्हेल या गेमने अक्षरश: सर्व पालकांना धास्तावून सोडले होते. ब्लू व्हेल नामक हा गेम आजवरचा सर्वात घातक गेम ठरला आहे. आता पर्यंत या गेमने 200 जणांचे बळी घेतले आहेत. हा गेम खेळणारी मुलं डिप्रेशनची शिकार होत असल्याचं समोर आलं आहे. धारदार शस्त्राने किंवा वस्तूने हातावर व्हेलचं चित्र काढणं, पहाटे 4वाजता अत्यंत भयप्रद व्हिडिओ पाहणं, उंचावरच्या इमारतीवरून उडी मारणं अशी काही चॅलेंज या गेममधून दिली जातात.
.

मोमो चॅलेंज – 

momo-1

मोमो चॅलेंज हा खेळ देखील ब्ल्यू व्हेलसारखाच व्हॉट्सअॅपवरून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करतो. ज्या व्यक्तीला टार्गेट करायचे असेल त्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवरून मोमो चॅलेंजचा मेसेज पाठवला जातो. त्यांना त्या क्रमांकावर ‘मोमो’ असा रिप्लाय द्यायचा आहे. हा रिप्लाय दिल्यानंतर त्या व्यक्तीला चित्रविचित्र फोटो पाठवले जातात. यात एका महिलेचा विचित्र फोटो आहे. या महिलेचे डोळे बाहेर आले असून एक विकृत हास्य तिच्या चेहऱ्यावर आहे. हा फोटो बघणाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहतो. या चॅलेंजच्या शेवटी त्या व्यक्तीला आत्महत्या करण्याचे आदेश दिले जातात.

पब जी –

pubg
मोबाईल गेमिंग विश्वात खळबळ माजवणाऱया ‘पबजी’ या गेमने अनेक तरुणांना वेड लावलं आहे. अनेक तरुण या गेमच्या इतके आहारी गेले की त्यांनी या व्यसनापायी स्वत:चा तरी जीव घेतला आहे किंवा कुणाची हत्या तरी केली आहे. हिंदुस्थानात आता पर्यंत पबजीमुळे आत्महत्या व हत्या झाल्याचे मोठे प्रमाण आहे. चीनसोडून इतर देशांमध्ये पबजीचे दररोज 5 कोटी ऍक्टिव्ह युजर्स आहेत