
रंगीबेरंगी कपडे घालून वावरणारी छोटी मुलं, त्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या बालकविता, बालगीते, नाट्याविष्काराचे बोबडे बोल, अनेक प्रतिभावंत कवी, लेखकांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेल्या विविध पुस्तकावरून फिरणार्या किलबिल नजरा, कौतुकाची थाप पाठीवर घेऊन गेल्या. एरवी व्यासपीठावर दिसणाऱ्या मोठ्या लोकांन ऐवजी लहानग्यांनी विविध कार्यक्रम तसेच सूत्रसंचालन पासून आभारापर्यंत सर्व जबाबदाऱ्या लीलया पार पाडल्या आणि लहानग्यांचे बोबडे बोल जेष्ठांच्या कौतुकास पात्र ठरले.
शिक्षण मंडळ कराड आयोजित दुसऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे. शिक्षण मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांच्यात वाचन संस्कृती वाढावी, विद्यार्थी पुस्तकाकडे आकर्षक व्हावेत. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेतून कराडचे सांस्कृतिक वैभव आणखी प्रगल्भ व्हावे, या हेतूने दुसरे विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित केले होते. महिला विद्यालयाच्या प्रांगणात, आचार्य विनोबा भावे मंडपात व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य मंचावर दुसऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनाची सुरूवात उत्साहात झाली आहे.
































































