
हिंदुस्थानच्या हवाई दलात जवळपास चार दशकांहून अधिक काळ पराक्रम गाजवणारे, कारगीलच्या युद्धात ब्रह्मास्त्र्ा ठरलेल्या ‘मिग-27’ लढाऊ विमानांचे युग संपणार आहे. शुक्रवारी ‘मिग-27’ श्रेणीतील सात लढाऊ विमाने अखेरचे उड्डाण घेतील.
‘मिग-27’ विमानांना अखेरचा निरोप देण्यासाठी हवाई दलाच्या सूर्यकिरण विमानांची टीम जोधपूर एअरबेसवर दाखल झाली आहे. सूर्यकिरण विमानांच्या थरारक प्रात्यक्षिकांच्या साक्षीनं ‘मिग-27’ विमानांचा सन्मान केला जाणार आहे. यावेळी ‘मिग-27’ श्रेणीतील सातही विमानांचे उड्डाण होईल. त्यानंतर हवाई दलाकडून या विमानांना सलामी दिली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘मिग-27’ श्रेणीतील विमाने इतर कोणताही देश वापर करत नाही. फक्त हिंदुस्थानात ही लढाऊ विमाने वापरली जात होती. त्यामुळे उद्याचे ‘मिग-27’ उड्डाण हे जगातील अखेरचे उड्डाण असेल.
n ‘मिग-27’ हे हिंदुस्थानच्या हवाई दलातील लढाऊ विमान हवेतून जमिनीवर मारा करणारे सर्वोत्तम विमान आहे. 1981 साली पहिल्यांदाच ‘मिग-27’ विमान हवाई दलात दाखल झाले होते. तब्बल 1700 किमी प्रतितास इतका तुफान वेग असलेल्या या विमानाची चार हजार किलो कजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. दरम्यान, या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक त्रुटींमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. गेल्या 10 वर्षांत विमान अपघाताच्या एकूण घटनांमध्ये सर्वाधिक मिग-27 याच लढाऊ विमानांचा समावेश होता. हवाई दलातील सूत्रांच्या माहितीनुसार, या विमानातील तांत्रिक अडचणी दूर करणं शक्य झालं नाही. त्यामुळे जवळपास तीन वर्षांपूर्वी या विमानांना हवाई दलाच्या ताफ्यातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.





















































