
भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी तपासात पुणे पोलीस आता फेडरल ब्युरो ऑफ इन व्हेस्टिगेशन (एफबीआय) या अमेरिकन तपास संस्थेची मदत घेणार आहेत. माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप असलेले वरवरा राव यांच्या घरातून जप्त करण्यात आलेला हार्ड डिस्कचा डेटा पुन्हा मिळवण्यासाठी ‘एफबीआय’ची मदत घेतली जाणार आहे.
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात वरवरा राव यांच्या घरी पोलिसांनी छापा मारून काही हार्ड डिस्क जप्त केल्या होत्या, मात्र यातील डेटा डिलीट करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा डेटा मिळवण्यासाठी एफबीआयची मदत घेतली जाणार असून लवकरच फॉरेन्सिक विशेषज्ञ क पोलिसांचे एक पथक अमेरिकेला रवाना होणार आहे.



























































